आज रात्री… बाराच्या ठोक्याला… नेहमीप्रमाणे… फक्त तारीख बदलेल. रोजच तर बदलते ती. दररोज दिनांक… दर ३०/३१ दिवसांनंतर महिना… आणि दर ३६५ दिवसांनंतर वर्ष. हे वर्ष बदलण मात्र आपण मोठ्या थाटात साजर करतो. वास्तविक, सरत्या वर्षामध्ये जे आपलं दैनंदिन जीवन असतं ते अगदी तसंच सुरु राहणार असतं येत्या वर्षामध्ये. ३६५ दिवस हा काही छोटा कालावधी नसला तरी बरेचदा त्या कालावधीमध्ये आपल्या आयुष्यात फार मोठा असा कोणताही बदल नसतो घडलेला. आणि जेव्हा केव्हा एखादा मोठा बदल घडतो तेव्हा ती तारीख काही १ जानेवारीच असते असेही काही नाही. तरीदेखील, नवीन वर्षाचं आगमन ही संकल्पनाच आपल्याला सुखावून जाते.
नाविन्याच अप्रूप संपूर्ण मानवजातीलाच आहे नाही का. त्यामुळेच असेल कदाचीत, नवीन वर्षाच आगमन हा आता एक जागतिक उत्सव झाला आहे. नोकरी-धंदा, स्वयंपाक-घरकाम, 'मॉल'-चित्रपट-नाटक… कशातही, कुठेही… तोच-तोचपणा आला कि आपल्याला नेहमीच कंटाळा येतो. म्हणूनच तर, 'नवीन काही आहे का?' हा प्रश्न न्याहारीपासून ते हाती पडलेल्या नव्या 'प्रोजेक्ट' पर्यंत आणि पुस्तकापासून ते कट्ट्यावरच्या गप्पांपर्यंत… कोणत्याही संदर्भात विचारला जाऊ शकतो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर होकारार्थी असेल तर मग तर क्या बात है!?!!! ती गोष्ट आपण दुप्पट उत्साहाने करतो.
आयुष्यातील नवीन टप्प्यांवर सगळीकडे आपोआप नाविन्याची झालर पसरते. परंतु असे बदल घडण्याची जेव्हा शक्यता नसते, तेव्हा आपल्यामधील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आपणच हे नाविन्य आपल्या आयुष्यात शोधून आणतो. नव्या-कोऱ्या कपड्यांच्या माध्यमातून येवो वा एखाद्या नवीन कलेचे ज्ञान प्राप्त करून येवो… नाविन्य आपल्या बरोबर हास्य, उत्साह आणि चैतन्य ह्या त्याच्या गोतावळ्याला सोबत घेऊनच आपल्या आयुष्यात प्रवेश करत.
अहो… साधं नवीन गाणं ऐकून अथवा नवीन पदार्थाची चव घेऊन खूष होणारं आपलं मन… नव्या-कोऱ्या, सुशोभित अशा वातावरणात किती आनंदी होईल बर! स्वतःच्या जुन्या खोलीमध्ये अचानक परी राण्या अवतरल्या भिंतींवर, कायमच्या वास्तव्यासाठी तर घरातील चिमुकलीचा आनंद गगनात मावणार नाही. वह्या-पुस्तकं, 'सी डिज' छान जपून, रचून ठेवता येतील असे कपाट, शांतचित्ताने अभ्यास करता येईल असे 'स्टडी टेबल' आले घरात तर अभ्यास करणं हादेखील एक आनंददायी अनुभव होइल. जुन्या, गोड आठवणींना उजाळा देता यावा ह्यासाठी 'फोटो फ्रेम्स' चा कोलाज रचला नव्याने 'बेडरूम' मध्ये तर नात्यातील गोडी वाढेल कि अजून. तुळशीवृन्दावन असो वा औषधी कोरफड, आजी-आजोबांच्या झाडांची छान, नीटनेटकी व्यवस्था झाली तर त्यांच्या 'पोस्ट-रिटायर्ड' आयुष्यात नवीन चैतन्य येइल. घराला दिलेला नवीन रंग असो वा स्वयंपाकघरातील नवीन रचना असो… ह्यात केलेला लहानसा बदलदेखील आपल्या 'मूड' वर मोठा परिणाम करून जातो. अहो, स्वानुभवातून सांगतो आहे हे. ग्राहकाला त्याच्या घरामध्ये अथवा 'ऑफीस'मध्ये समाधानकारक बदल करून देणे असं आमचं साधं-सोपं उद्दिष्ट कधीच नसत. ग्राहकाच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, कर्मचार्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे ह्या मुख्य उद्देशाने आल्हाददायक बदल घडवून आणण्याकडे आमचा कल असतो. अर्थात हे करताना ग्राहकाच्या गरजांची आणि बांधकामाच्या मजबुतीला तडा न जाऊ देण्याचीदेखील काळजी घेतो आम्ही.
नवीन वर्षाच स्वागत आपण उत्साहाने कराल यात शंकाच नाही. त्याचबरोबरीने कदाचीत काही योजनाही आखाल येत्या वर्षासाठी. नवीन वर्षात घरामध्ये अथवा ऑफिसमध्ये 'रिनोवेशन' करण्याचा विचार असेल तर आकृती इंटिरियरर्स आपल्या सेवेस आनंदाने हजार होईल ह्याची खात्री बाळगा.
- Amol Vishwas Joshi
Interior Designer
AAkruti Interiors
Kandivli, Mumbai
9967534621